कोहली आणि वॉटसनमध्ये तणाव, दाखवू शकतात बाहेरचा रस्ता

आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यामध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीची टीम ही कमजोर मानली जात आहे. राइजिंग पुणे सुपरजाएन्टने पराभव करण्यापूर्वी विराटचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे चांगली संधी आहे विजय मिळवण्यासाठी. पण खराब बॅटींगमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर विराटने म्हटलं की, वॉटसनला आम्ही ९ कोटींना घेतलं पण तो २ कोटींचं काम देखील नाही करत आहे.

Updated: Apr 17, 2017, 04:57 PM IST
कोहली आणि वॉटसनमध्ये तणाव, दाखवू शकतात बाहेरचा रस्ता title=

मुंबई : आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यामध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीची टीम ही कमजोर मानली जात आहे. राइजिंग पुणे सुपरजाएन्टने पराभव करण्यापूर्वी विराटचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे चांगली संधी आहे विजय मिळवण्यासाठी. पण खराब बॅटींगमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर विराटने म्हटलं की, वॉटसनला आम्ही ९ कोटींना घेतलं पण तो २ कोटींचं काम देखील नाही करत आहे.

टीमला वॉटसनकडून चांगली कामगिरीची अपेक्षा होती पण तो लवकर आऊट झाला. यावर्षी वॉटसनची बॅटिंग स्ट्राइक रेट 10.78 होती तर बॉलिंग इकॉनमी 11.66 रन प्रती ओव्हर आहे. कोहलीच्या या वक्तव्यामुळे आता असं म्हटल जातंय की यामुळे वाद होऊ शकतो आणि वॉटसनला टीममधून बाहेर केलं जाऊ शकतं.