कोहलीने रचला नवा इतिहास

रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहली दमदार नाबाद शतक झळकवत दोन विक्रम आपल्या नावे केले. कोहलीने या सामन्यात नाबाद १०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बंगळूरुला पुण्यावर सात विकेट राखून विजय मिळवता आला. 

Updated: May 8, 2016, 11:22 AM IST
कोहलीने रचला नवा इतिहास title=

बंगळूरु : रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्धच्या सामन्यात शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहली दमदार नाबाद शतक झळकवत दोन विक्रम आपल्या नावे केले. कोहलीने या सामन्यात नाबाद १०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बंगळूरुला पुण्यावर सात विकेट राखून विजय मिळवता आला. 

विराट आयपीएलमधील असा क्रिकेटपटू आहे ज्याने एकाच हंगामात दोन शतके झळकावलीत. याआधी त्याने २४ एप्रिलला गुजरात लायन्सविरुद्ध खेळताना नाबाद १०० धावांची खेळी केली होती. याशिवाय तो एकमेव असा कर्णधार आहे ज्याने तीन आयपीएल सत्रात ५०० हून अधिक धावा केल्यात. याआधी २०१५मध्ये ५०५ आणि २०१३च्या हंगामात ६३४ धावा केल्या होत्या.

कोहलीने बंगळूरुकडून खेळताना या हंगामात आठ सामन्यात आतापर्यंत ५४१ धावा करताना सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डही मोडलाय. सचिन मुंबईचा कर्णधार असताना त्याने २०११च्या सत्रात ५५३ आणि २०१०मध्ये ६१८ धावा केल्या होत्या. विराटने हा रेकॉर्डही मागे टाकलाय. तसेच २०१३च्या हंगामात ६३४ धावा करताना सर्वाधिक धावा करणारा कर्णधार म्हणूनही विक्रम त्याच्या नावे आहे.