पुण्याचा केदार जाधव ठरला मॅन ऑफ द सिरीज

कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटच्या वनडेत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली. इंग्लंडने पाच रन्सने विजय मिळवला आणि व्हाईटवॉश टाळला. भारताने ही सिरीज 2-1 ने जिंकली. या सिरीजमध्ये पुण्याचा केदार जाधवने सर्वांचच मन जिंकलं. तीन मॅचमध्ये 230 रन्स करत त्याने मॅन ऑफ द सिरीजवर आपलं नावं कोरलं.

Updated: Jan 22, 2017, 11:27 PM IST
पुण्याचा केदार जाधव ठरला मॅन ऑफ द सिरीज title=

कोलकाता : कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटच्या वनडेत शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली. इंग्लंडने पाच रन्सने विजय मिळवला आणि व्हाईटवॉश टाळला. भारताने ही सिरीज 2-1 ने जिंकली. या सिरीजमध्ये पुण्याचा केदार जाधवने सर्वांचच मन जिंकलं. तीन मॅचमध्ये 230 रन्स करत त्याने मॅन ऑफ द सिरीजवर आपलं नावं कोरलं.

पहिल्या सामन्यात केदारने 120 रन्स केले तर कटक मध्ये दुसऱ्य़ा वनडेत त्याने 9 चेडूत 22 रन्स करत विजयात वाटा उचलला. तिसऱ्या सामन्यामध्ये त्याने शेवटपर्यंत झुंज देत  75 चेंडूत 90 रन्सची खेळी केली. केदारने हार्दिक पांड्यासोबत पार्टनरशिप करत मॅच विजयापर्यंत खेचली पण बेन स्टोकने त्याची विकेट घेतली आणि विजयाच्या आशा मावळल्या. आता 26 जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सिरीज रंगणार आहे.