'ज्युनिअर मलिक लवकरच'... शोएबचं ट्विट!

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानावर दाखल झालीय. महिला डबल टेनिस रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर दाखल झालीय. या खुशखबरीसोबतच सानिया आणि तिचा पती शोएब अख्तर त्यांच्या चाहत्यांना आणखीन एक 'गुड न्यूज' देण्याच्या तयारीत आहेत, असं दिसतंय. 

Updated: Apr 15, 2015, 10:05 PM IST
'ज्युनिअर मलिक लवकरच'... शोएबचं ट्विट! title=

मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानावर दाखल झालीय. महिला डबल टेनिस रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर दाखल झालीय. या खुशखबरीसोबतच सानिया आणि तिचा पती शोएब अख्तर त्यांच्या चाहत्यांना आणखीन एक 'गुड न्यूज' देण्याच्या तयारीत आहेत, असं दिसतंय. 

ट्विटरवर फॅन्सनं विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शोएबनं 'ज्युनिअर मलिक लवकरच येईल... इन्शाअल्लाह' असं म्हटलंय. 

सोबतच, आपण सानियाचे नंबर वन फॅन आहोत, असंही शोएबनं बिनादिक्कत कबूल केलंय.

अशाच काही गमतीदार प्रश्नांना शोएब मलिकनं तशाच प्रकारची गमतीदार उत्तरं दिलीत... यामुळेच #AskMalik हा टॅग ट्विटरवर ट्रेन्डिंग करताना दिसला.

प्रश्न : टीनेजमध्ये एखाद्या मुलीच्या प्रेमात पडलायस?
उत्तर : होय, आणि ती सानिया नव्हती

प्रश्न : फेव्हरेट रोमॅन्टिक गाणं?
उत्तर : तुम ही हो

प्रश्न : टीव्हीचा रिमोट कुणाकडे असतो?
उत्तर : नेहमीच सानियाकडे

प्रश्न : तुला क्रिकेट खेळायला कुणी उद्युक्त केलं?
उत्तर : वसिम भाई... मी १९९५ ला त्याचा ऑटोग्राफ घेतला होता... आणि १९९९ साली त्याच्या कॅप्टन्सीखाली खेळलो... स्वप्न प्रत्यक्षात आलं.

प्रश्न : धोनी की कोहली? इम्रान खान की वसिम अक्रम?
उत्तर : धोनी आणि वसिम

प्रश्न : सलमान की शाहरुख खान?
उत्तर : सलमान

प्रश्न : सानिया तुला बॅटने मारते की टेनिस रॅकेटनं?
उत्तर : तुला काय वाटतं?

प्रश्न : आवडता सिनेमा?
उत्तर : डीडीएलजे

प्रश्न : पाकिस्तान टेनिस स्टार आणि तुझी पत्नी सानिया आमने-सामने असतील तर तू कुणाला सपोर्ट करशील?
उत्तर : निश्चितच माझ्या पत्नीला... खेळाडू आणि पाकिस्तान देशाकडूनही

प्रश्न : फेव्हरेट हॉलिडे डेस्टीनेशन?
उत्तर : मालदीव

प्रश्न : कोणत्या भारतीय बॉलर तुला सर्वात त्रासदायक ठरतो?
उत्तर : हरभजन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.