पाकिस्तानचा गोलंदाज जुनैद खानच्या पहिल्या मुलाचा मृत्यू

 पाकिस्तान टीमचा जलद गती गोलंदाज आणि सध्या पाकिस्तान कपमध्ये बलुचिस्तानकडून खेळणारा जुनैद खानने आपल्या पहिल्या मुलाला  जन्माच्या वेळीच गमावेले. 

Updated: Apr 28, 2016, 09:59 PM IST
 पाकिस्तानचा गोलंदाज जुनैद खानच्या पहिल्या मुलाचा मृत्यू title=

इस्लामाबाद :  पाकिस्तान टीमचा जलद गती गोलंदाज आणि सध्या पाकिस्तान कपमध्ये बलुचिस्तानकडून खेळणारा जुनैद खानने आपल्या पहिल्या मुलाला  जन्माच्या वेळीच गमावेले. 

त्याच्या पत्नीच्या प्रकृतीत हळूहळू सुधार होत आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण अजून समजले नाही. 

 

काय म्हणाला जुनैद

सोशल मीडियावर ट्विट करताना जुनैद म्हणाला की, माझ्या आयुष्यातील सर्वात खराब दिवस होता. मी माझ्या पहिल्या मुलाला गमावले. पण अल्लाहची मेहरबानी आहे की माझ्या पत्नीची प्रकृती ठी आहे. ती लवकरच ठीक होईल, अल्लाहचे धन्यवाद...

शाहिद आफ्रिदीबाबत अफवा पण...

नुकतेच पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा मृत्यूची अफवा पसरली होती. पण नंतर ही अफवाच असल्याचे समोर आले होते. आफ्रिदीची अफवा असली तरी जुनैदची बातमी खरी आहे. 

जुनैदचे रेकॉर्ड

जुनैदने पाकिस्तानसााठी २२ टेस्टमध्ये ७१ विकेट घेतल्या आहेत. तर ५२ वन डेमध्ये ७८ विकेट आपल्या नावावर नोंदविल्या आहेत. तर टी २० मध्ये ८ विकेट जुनैदच्या नावावर आहे.