मुंबई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि जगमोहन दालमियाँ यांची पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. जगमोहन दालमियाँ जवळ-जवळ दहा वर्षांनी पुन्हा बीसीसीआयच्या कार्यकारीणीवर कमबॅक करतायत.
जगमोहन दालमियाँ यांच्याविरोधात कुणीही उमेदवारी दाखल केलेली नसल्याचं सांगण्यात येतंय. जगमोहन दालमियाँ हे डॉलरमियाँ म्हणून देखिल ओळखले जातात.क्रिकेटच्या अर्थव्यवस्थेला त्यांनी मोठ्या प्रमाणात गती दिली, फक्त भारतीय नव्हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसा आणल्याने त्यांना डॉलरमियाँ म्हणून ओळखले जाते.
दालमियाँ यांचा शरद पवार यांनी पराभव केल्यानंतर ते या पदापासून दूर गेले होते, त्यानंतर त्यांचा बंगाल क्रिकेट असोसशिएनच्या निवडणुकीतही पराभव झाला होता, पण दालमियाँ यांनी पुन्हा कमबॅक केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.