टी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली

2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. 

Updated: Apr 4, 2016, 05:15 PM IST
टी 20 चा कॅप्टन झाला विराट कोहली title=

मुंबई: 2016 चा टी20 क्रिकेट वर्ल्ड कप वेस्ट इंडिजनं जिंकला आहे. यानंतर आता आयसीसीनं या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. 

स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकवणारा विराट कोहलीला या टीमचा कॅप्टन बनवण्यात आलं आहे, तर आशिष नेहरा हा दुसरा भारतीय हा संघामध्ये आहे. 

आयसीसीच्या टीममध्ये कोणाला स्थान ?

जेसन रॉय (इंग्लंड)

क्वांटन डि कॉक (दक्षिण आफ्रिका)

विराट कोहली (कॅप्टन) (भारत)

जो रूट (इंग्लंड)

जॉस बटलर (इंग्लंड)

शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)

आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)

मिचेल सँटनर (न्यूझीलंड)

डेव्हिड विली (इंग्लंड)

सॅम्युअल बद्री (वेस्ट इंडिज)

आशिष नेहरा (भारत)

एम रेहमान, बारावा खेळाडू (बांग्लादेश)