ऑस्ट्रेलियाचा बॉलर जॉशचा 'आयपीएल'ला 'जय महाराष्ट्र'

मुंबई टीममध्ये मागील वर्षी सहभागी झालेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर जॉश हेजलवूडने आयपीएस सिझन ८ मधून आपलं नाव मागे घेतलं आहे. 

Updated: Apr 9, 2015, 08:17 PM IST
ऑस्ट्रेलियाचा बॉलर जॉशचा 'आयपीएल'ला 'जय महाराष्ट्र' title=

मुंबई : मुंबई टीममध्ये मागील वर्षी सहभागी झालेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर जॉश हेजलवूडने आयपीएस सिझन ८ मधून आपलं नाव मागे घेतलं आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार आता हेझलवुड मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार नाही.

जॉशवर आयपीएल क्रिकेटमुळे वर्कलोड वाढला असल्याचं सांगितलंय, भारतासोबत झालेली टेस्ट सिरीज, त्यानंतर वनडे तिरंगी मालिका आणि नंतर वर्ल्डकप यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर वर्कलोड वाढला आहे. आराम करण्यासाठी जॉशने आयपीएलमध्ये न खेळण्याची भूमिका घेतली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.