बीबीएलमध्ये पहिल्या भारतीय महिला क्रिकेटरची निवड

ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वुमन बिग बॅश लीगमध्ये पहिल्यांदाच एका भारतीय महिला क्रिकेटरचा समावेश झाला आहे. २७ वर्षांची हरमनप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू आहे. ती इंडियन वुमन क्रिकेट टीमची कर्णधार देखील होती.

Updated: Jan 8, 2017, 11:57 AM IST
बीबीएलमध्ये पहिल्या भारतीय महिला क्रिकेटरची निवड title=

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वुमन बिग बॅश लीगमध्ये पहिल्यांदाच एका भारतीय महिला क्रिकेटरचा समावेश झाला आहे. २७ वर्षांची हरमनप्रीत कौर भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू आहे. ती इंडियन वुमन क्रिकेट टीमची कर्णधार देखील होती.

हरमनप्रीत लुधियानामधील मोगा या गावची आहे. सोबत प्रॅक्टीस करण्यासाठी मुली भेटत नव्हत्या तेव्हा हरमनप्रीतने मुलांसोबत प्रॅक्टीस करण्यास सुरुवात केली होती.

२००९ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या महिला वर्ल्डकमध्ये एका मॅचमध्ये हरमनप्रीतने जबरदस्त सिक्स लगावला होता. इतका लांब सिक्स पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले होते. यामुळे तिचं डोप टेस्ट केलं गेलं. बॅटची देखील चौकशी झाली. पण निर्णय तिच्या बाजून लागला.

क्रिकेटसाठी तिच्याकडे योग्य वातावरण नव्हतं. मुलांमध्येच तिने क्रिकेट खेळणे सुरु केलं. घरातून देखील थोडा विरोध झाला. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा देखील तिला सर्वात आधी टीशर्ट घातला गेला ज्यावर लिहिलं होतं गुड बॅटींग. तो टी-शर्ट अजूनही सांभाळून ठेवण्यात आला आहे.

दंगलमध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी ती नेहमी ८४ नंबरचा टीम इंडियाचा टीशर्ट वापरते. अनेकांनी तिचं नाव लिहिलेलं टीशर्ट तिला गिफ्ट केलं गेलं पण कधीच तिने ते टीशर्ट घातले नाहीत.