मॅच फिक्सिंग भोवली. क्रिकेट खेळायला खेळाडूला 20 वर्षांची बंदी

मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू गुलाम बोदीवर 20 वर्ष क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बोदीला आता आंतरराष्ट्रीय किंवा फर्स्ट क्लास मॅचेस पुढची 20 वर्ष खेळता येणार नाही.

Updated: Jan 25, 2016, 09:10 PM IST
मॅच फिक्सिंग भोवली. क्रिकेट खेळायला खेळाडूला 20 वर्षांची बंदी title=

जोहान्सबर्ग: मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू गुलाम बोदीवर 20 वर्ष क्रिकेट खेळायला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बोदीला आता आंतरराष्ट्रीय किंवा फर्स्ट क्लास मॅचेस पुढची 20 वर्ष खेळता येणार नाही.

बोदीनं मॅच फिक्स केल्याचा संशय आल्यानंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या अँटी करप्शन युनिटनं त्याची चौकशी केली, या चौकशीदरम्यान बोदीला 18 जानेवारीपर्यंत उत्तर द्यायची मुदत देण्यात आली. तेव्हा मी 2015 च्या रॅमस्लॅम टी-20 सीरीजमध्ये मॅच फिक्सिंग केली होती, अशी कबुली बोदीनं दिली, त्यामुळे त्याच्यावर 20 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 

दरम्यान बोदीनं रॅमस्लॅम टी-20 वेळी काही आफ्रिकन खेळाडूंनाही मॅच फिक्सिंगची ऑफर दिली होती, पण त्यांनी बोदीची ऑफर धुडकावून लावली अशी प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डानं दिली आहे. ऑफर फेटाळणारे ते खेळाडू कोण, यावर मात्र बोर्डानं उत्तर दिलं नाही.