फिफा अध्यक्ष : सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत

फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

Reuters | Updated: Jun 3, 2015, 02:16 PM IST
फिफा अध्यक्ष :  सेप ब्लॅटर यांचा राजीनामा, सुनील गुलाटी शर्यतीत title=

न्यूयॉर्क : फुटबॉल महासंघाचे (फिफा) सेप ब्लॅटर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सुनील गुलाटी यांचे चर्चेत आहे.

ब्लॅटर यांच्या राजीनाम्याबाबत अमेरिकेने दबाव आणला होता. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या (२०१८ आणि २०२२ यजमानपदाचे हक्क देताना लाचखोरी केल्याचा आरोप असल्यामुळे ब्लॅटर यांना अमेरिका, इंग्लंड यांच्यासह युरोपियन फुटबॉल संघटनेने घेरले होते. प्रचंड विरोध असतानाही त्यांनी अध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक जिंकली होती.

अमेरिका, इंग्लंड यांचा हस्तक्षेप जुमानत नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते. ब्लॅटर यांच्या विजयानंतर प्रामुख्याने युरोपियन फुटबॉल संघटनेने विरोध कायम ठेवला होता, त्यामुळे फिफा फुटीच्या उंबरठ्यावर होते.

रशियात २०१८ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेला टक्कर देण्यासाठी समांतर विश्‍वकरंडक स्पर्धा घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. या सर्व घडामोडींमुळे व्यथित झालेल्या ब्लॅटर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

भारतीय गुलाटी
दरम्यान, गुलाटी हे सलग तिसऱ्यांदा अमेरिका फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष बनले आहेत. गेल्या तीन दशकांत गुलाटी यांनी अमेरिका फुटबॉलमध्ये अमुलाग्र बदल केलेला आहे. 

५५ वर्ष वय असलेल्या गुलाटी यांचा जन्म अलाहाबाद येथे झाला होता. अमेरिकी माध्यमांमध्ये ब्लॅटर यांच्याजागी गुलाटी यांचे नाव आघाडीवर असल्याचे आणि या पदावर अमेरिकन नागरिकाचा हक्क असल्याची चर्चा आहे. गुलाटी यांनीही ब्लॅटर यांच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.