कोहलीला स्टम्प काढून मारणार होता हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू

भारत आणि आस्ट्रेलिया यांच्यात नुकताच झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये अनेक वाद पाहायला मिळाले. आता आस्ट्रेलियाचा खेळाडू एड कोवानने कोहलीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. 

Updated: Mar 31, 2017, 04:46 PM IST
कोहलीला स्टम्प काढून मारणार होता हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू title=

नवी दिल्ली : भारत आणि आस्ट्रेलिया यांच्यात नुकताच झालेल्या टेस्ट सिरीजमध्ये अनेक वाद पाहायला मिळाले. आता आस्ट्रेलियाचा खेळाडू एड कोवानने कोहलीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. 

कोहली सोबत झालेल्या एका जुन्या घटनेला आठवत आस्ट्रेलियाचा माजी ओपनर खेळाडू एड कोवानने म्हटलं आहे की, एक अनुचित शब्द वापरल्यानंतर एकदा तो भारताचा कर्णधाराला स्टंम्प उखडून मारणार होता.

भारताने टेस्ट सीरीजमध्ये आस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला. या टेस्ट सिरीजमध्ये अनेकदा वाद झाला. भारतीय कर्णधार कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ यामुळे चर्चेत होते.

कोवानने म्हटलं की, त्या सिरीज दरम्यान माझी आई आजारी होती आणि त्याने असं काही म्हटलं की जे मला अयोग्य वाटलं. हा वाद खूप संवेदनशील होता. जेव्हा अंपायरने म्हटलं की विराट तू सीमा ओलांडली आहे तेव्हा विराट मागे हटला आणि त्याने माफी मागितली. पण त्यावेळेस मला इतका राग आला होता की असं वाटत होतं की स्टम्प काढून विराटला मारावं.'

कोवानने शेवटी असं ही म्हटलं की तो भारतीय कर्णधार विराट कोहलीचं कौतूक ही करतो. मी त्याच्या क्रिकेटचा फॅन आहे. मला चुकीचं नका समजू तो एक उत्तम क्रिकेटर आहे.'