महेंद्रसिंग धोनीचं आणखी एक रेकॉर्ड

भारताचा वनडे आणि टी 20 चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे.

Updated: Jun 23, 2016, 08:52 PM IST
महेंद्रसिंग धोनीचं आणखी एक रेकॉर्ड title=

हरारे : भारताचा वनडे आणि टी 20 चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे. धोनीनं कॅप्टनशीपमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉईंटिंगची बरोबरी केली आहे. टेस्ट, वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये पॉईंटिंगनं 324 मॅचमध्ये कॅप्टनशीप केली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 मध्ये धोनीनं पॉईंटिंगच्या या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 

रिकी पॉईंटिंगनं 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पॉईंटिंगनं 77 टेस्ट, 229 वनडे आणि 17 टी 20 मध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं. पॉईंटिंगनं 324 मॅचपैकी 220 मॅच जिंकल्या, 77 हारल्या, 2 मॅच टाय आणि 13 मॅच ड्रॉ झाल्या. 

तर धोनीनं 324 मॅचमध्ये नेतृत्व केलं, यापैकी 175 मॅचमध्ये विजय, 117 पराभव, 15 ड्रॉ आणि 5 मॅच टाय झाल्या. पॉईंटिंगचं हे रेकॉर्ड तोडण्यासाठी धोनीला आता फक्त एका मॅचची आवश्यकता आहे, पण यासाठी धोनीला तीन महिने थांबायची गरज आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये भारत वनडे किंवा टी 20 मॅच खेळणार नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये भारत आणि न्यूझिलंड सीरिजमध्ये धोनी पॉईंटिंगचं हे रेकॉर्ड तोडेल.