'युवराजमुळे दबाव आला'

ऑस्ट्रेलियाला हरवून भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. विराट कोहलीनं या मॅचमध्ये 82 रनची खेळी केली

Updated: Mar 28, 2016, 07:57 PM IST
'युवराजमुळे दबाव आला' title=

मोहाली: ऑस्ट्रेलियाला हरवून भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. विराट कोहलीनं या मॅचमध्ये 82 रनची खेळी केली, कोहलीला पहिले युवराज सिंगनं आणि नंतर महेंद्रसिंग धोनीनं साथ दिली. 

पण युवराज दुखापतग्रस्त झाल्यामुळे आम्हाला शेवटी जास्त रन चेस कराव्या लागल्या, असं धोनी म्हणाला आहे. युवराजच्या पायाला दुखापत झाल्यानं आम्हाला 2 रन काढता आल्या नाहीत, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आम्हाला जास्त रन कराव्या लागल्याची प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे. 

मधल्या ओव्हरमध्ये जेव्हा तुम्ही 2 रन धावता, तेव्हा विरोधी टीमवर दबाव येतो, मग दुसऱ्या टीमचा कॅप्टन फिल्डर्सन पुढे आणतो, तेव्हा तुम्हाला या खेळाडूंच्या डोक्यावरून शॉट मारायची संधी मिळते, अस धोनी म्हणाला.