पवन नेगीला दिल्ली टीमने ८.५ कोटीत का खरेदी केलं?

ही किंमत ३० पटीने अधिक .

Updated: Feb 11, 2016, 08:56 PM IST

मुंबई : आपण गेल्या रविवारी आयपीएल खेळाडूंचा लिलाव पाहिला असेल, यात पवन नेगी या दिल्ली डेअर डेविल्सकडून ८.५ कोटी रूपये बोली लावण्यात आली. पवन नेगीने आतापर्यंत दिल्लीसाठी तीन सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सविरोधात मागील वर्षी खेळतांना पवन नेगीने १७ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या. मागील आयपीएलपेक्षा पनव नेगीसाठी ही किंमत ३० पटीने अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. यापूर्वी २३ वर्षाचा पवन नेगी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. पवन नेगीला कशाच्या जोरावर एवढे पैसे मिळाले, पुरावा म्हणून हा व्हिडीओ पाहा.