मेलबर्न : टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने गुरूवारी बांगलादेश टीमला पराभूत करून, वनडे क्रिकेटमधील आपला शंभरावा विजय साजरा केला.
या विजयानंतर धोनी वर्ल्ड क्रिकेटमधील तिसरा सर्वात यशस्वी कॅप्टन ठरला आहे. कॅप्टन कूल धोनीने गुरूवारी दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन हॅन्सी क्रोनिएला मागे टाकत हा टप्पा गाठला आहे.
आता कॅप्टन धोनीच्या पुढे फक्त अॅलन बॉर्डर दोन नंबरवर आहेत, तर (१०७) आणि रिकी पॉन्टिंग (१६५) नंबर वनवर आहे.
धोनीने टीम इंडियासाठी १७८ वेळा कॅप्टनशीप केली आहे, यात १०० सामने जिंकण्यात धोनीला यश आलं आहे, तर ६२ सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
यात ४ सामने टाय झालेत, तर ११ सामन्यांमध्ये कोणताही निर्णय देता आलेला नाही, तसेच टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये लगोपाठ ११ सामने जिंकण्याचाही विक्रम केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.