इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये बटलरने केली धोनीची कॉपी

टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्यातील सामना प्रत्येकाच्या लक्षात राहिला असाच झाला होता. भारताने तो सामना धोनीच्या चातुर्यामुळेच जिंकला असं म्हणायला हरकत नाही. धोनीने शेवटच्या बॉलमध्ये केलेला रन आऊट हे विजयाचा मुख्य कारण होतं.

Updated: Mar 31, 2016, 03:56 PM IST
इंग्लंड-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये बटलरने केली धोनीची कॉपी title=

मुंबई : टी-२० वर्ल्डकपमधील भारत-बांग्लादेश यांच्यातील सामना प्रत्येकाच्या लक्षात राहिला असाच झाला होता. भारताने तो सामना धोनीच्या चातुर्यामुळेच जिंकला असं म्हणायला हरकत नाही. धोनीने शेवटच्या बॉलमध्ये केलेला रन आऊट हे विजयाचा मुख्य कारण होतं.

महेंद्रसिंग धोनीने आधीच एका हातामधला गल्ब हा काढून टाकला कारण धोनीला अंदाज होता की बॉल जर त्याच्या जवळ आला तर त्याला रनआऊट करायची संधी मिळेल आणि तसंच झालं.

बुधवारी झालेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा किपर बटलरने देखील धोनीची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या बॉलआधी त्याने एका हातातला गल्ब काढून ठेवला. 

पाहा व्हिडिओ