मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टी 20 वर्ल्ड कपच्या गेम चेंजर खेळाडूविषयी भविष्यवाणी केली आहे. जसप्रीत बुमराह हा या वर्ल्ड कपमध्ये भारताचा गेम चेंजर खेळाडू असू शकतो, असं सचिन म्हणाला आहे.
सचिन तेंडुलकरनं भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचंही कौतुक केलं आहे. धोनीवर कितीही दबाव आला तरी तो घाबरल्याचं दाखवत नाही, याचा फायदा होतो, असं सचिन म्हणाला आहे.
एशिया कपच्यावेळी युवराजनंही फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिले आहेत, तसंच त्याची मानसिकता बदलल्याचं दिसत आहे, ज्याचा भारताला फायदा होईल असं सचिनला वाटत आहे.