आफ्रिदीने केलं बॉलरला बॅटने जखमी

पाकिस्तानचा कॅप्टन शाहीद आफ्रिदी याने त्याच्या बॅटने एका बॉलरला जखमी केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट लीग आता वादग्रस्त लीग ठरत चालली आहे. या लीगमध्ये आधीही खेळाडूंमध्ये वाद झाले आहेत. त्यामुळे आता या लीगला वादाचं ग्रहण लागलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 20, 2016, 08:13 PM IST
आफ्रिदीने केलं बॉलरला बॅटने जखमी title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचा कॅप्टन शाहीद आफ्रिदी याने त्याच्या बॅटने एका बॉलरला जखमी केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट लीग आता वादग्रस्त लीग ठरत चालली आहे. या लीगमध्ये आधीही खेळाडूंमध्ये वाद झाले आहेत. त्यामुळे आता या लीगला वादाचं ग्रहण लागलं आहे.

व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी

शाहीद आफ्रिदी रन काढत असतांना तो बिलावल भट्टी हा मध्ये आला. त्यावेळेस आफ्रिदीने त्याच्या बॅटने त्याला बाजुला केलं पण हा धक्का इतक मोठा होता की बॉलर खाली पडला आणि त्याच्या पाठीला दुखापत झाली.

सहावी वोव्हर सुरू असतांना भट्टीने त्याला एलबीडब्लू केलं. या घटनेनंतर भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने देखील आक्रमक भूमिका कायम ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय संघाला आशिया कप आणि टी -20 वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानच्या या वादग्रस्त ठरत चाललेल्या टीमसोबत सामना खेळायचा आहे.

या आधी देखील पाकिस्तानच्या टीममधील खेळाडूंनी भारतीय खेळाडूंसोबत वाद घालण्याचे प्रयत्न केले आहेत.