नवी दिल्ली : अश्विन एका वर्षात सात इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे.
एका कॅलेंडर वर्षात सातव्या वेळा पाच विकेट घेण्याची किमया अश्विनने करून दाखवली आहे. गेल्या सामन्यात त्याने सहा वेळा पाच विकेट घेऊन अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्याशी बरोबरी केली होती.
अश्विनची ही कामगिरी सर्वार्थाने उत्कृष्ट मानली पाहिजे. त्याने ही कामगिरी केवळ ९ सामन्यात करून दाखवली आहे. त्याने बेस्ट कामगिरी ६६ धावा देऊन सात विकेट घेतल्या आहेत.
अश्विनने १६ वेळा पाच विकेट घेतल्या आहे. ही कामगिरी त्याने भारतातील १९ टेस्टमध्ये केली आहे.
जागतिक स्तरावर त्याने मुरलीधरन, डोनाल्ड आणि रंगना हेराथ यांच्याशी बरोबरी केली आहे. मुरलीधरन याने १९९८, २००० आणि २००१ या वर्षात केली होती. डोनाल्ड याने १९९८ मध्ये तर रंगना हेराथ याने २०१२ मध्ये एका वर्षात सात वेळा पाच विकेट घेतल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.