हैदराबाद : आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणार भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं पुन्हा एकदा स्वत:वरचं नियंत्रण गमावलं. विराट सनरायजर्स विरुद्धच्या रोमांचक सामन्यात थेट अंपायर कुमार धर्मसेनालाच जाऊन भिडला. या दरम्यान दिनेश कार्तिकही विराटच्या बाजूने दिसला.
सामन्या दरम्यान विराट आणि अंपायर यांच्यात झालेल्या बाचाबाचीचं कारण होतं, पाऊस... पाऊस पडत असून देखील सामना सुरू ठेवल्याबद्दल विराटने अंपायरवर नाराजी व्यक्त केली.
पावसामुळे सामना २ तास ४० मिनिटं उशिरानं सुरू झाला होता. त्यामुळे सामना ११-११ ओव्हर्सचा ठेवण्यात आला होता. मात्र, हैदराबादची फलंदाजी सुरू असताना दहाव्या ओव्हरमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यानंतर ११ व्या ओव्हरमध्ये पाऊसाचा जोरात पडू लागला. या गोष्टीकडे विराटने अंपायरचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र अंपायरने त्याकडे दूर्लक्ष करत सामन्याची पहिली इनिंग संपवली.
यावर नाराजी व्यक्त करताना विराट थेट अंपायर कुमार धर्मसेनासोबत जाऊन भिडला. विराट आपली नाराजी थोडक्यात आवरली. मात्र त्यानंतर दिनेश कार्तिक पॅव्हेलियअनमध्ये जाईपर्यंत अंपायरशी वाद घालताना दिसला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.