आयसीसी वनडे रँकिगमध्ये अक्षर पटेलला टॉप १० मध्ये स्थान

भारत-न्यूजीलंडमध्ये झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजनंतर आयसीसीने नव्या गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने सीरीजमध्ये 4 विकेट घेतले त्यामुळे रँकिंगमध्ये त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेल पहिल्यांदा टॉप 10 मध्ये आला असून तो 9 व्या स्थानावर आहे.

Updated: Oct 31, 2016, 01:27 PM IST
आयसीसी वनडे रँकिगमध्ये अक्षर पटेलला टॉप १० मध्ये स्थान title=

मुंबई : भारत-न्यूजीलंडमध्ये झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजनंतर आयसीसीने नव्या गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने सीरीजमध्ये 4 विकेट घेतले त्यामुळे रँकिंगमध्ये त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेल पहिल्यांदा टॉप 10 मध्ये आला असून तो 9 व्या स्थानावर आहे.

अमित मिश्राने सीरीजमध्ये १५ विकेट घेतले. त्याला देखील २५ स्थानांचा फायदा झाला आहे. मिश्रा आता 12व्या स्थानावर आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये हे दोन्ही गोलंदाज सध्या टॉप रँकिंगमध्ये आहेत.

न्यूजीलंडचा ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर आहे. अक्षर टॉप 10 मध्ये आल्याने अफगानिस्तानचा मोहम्मद नबी 11व्या स्थानावर गेला आहे. इतर टॉप 10 मध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.

सीरीजमध्ये रविचंद्रन अश्विनला आराम देण्यात आला होता. त्यामुळे त्याला तीन स्थानांचं नुकसान झालं आहे. तो 16व्या स्थानावर गेला आहे. उमेश यादवला सात स्थानांचा फायदा झाला आहे. तो 35व्या आणि जसप्रीत बुमराह 59 व्या स्थानावर आहे.

टॉप 50 मध्ये भारताचे भुवनेश्वर कुमार आणि रविन्द्र जडेजा यांचा समावेश आहे. टॉप 100 मध्ये धवल कुलकर्णी हा 77व्या स्थानावर आहे. ऑलराउंडरच्या रँकिंगमध्ये भारताचा रविन्द्र जडेजाचं स्थान कायम आहे पण त्याला दोन स्थानांचं नुकसान झालं आहे. तो आठव्या स्थानावर आहे. न्यूजीलंडचा कोणताही खेळाडू टॉप 10 मध्ये नाही.

आयसीसी टॉप १० गोलंदाज 

रॅंकिग   खेळाडू          पॉइंट्स
1.     ट्रेंट बोल्ट            735
2.     सुनील नरायणे      725
3.     इमरान ताहीर      712
4.     मिचेल स्टार्क        690
5.     मॅट हेनरी            661
6.     शकीब अल हसन  660
7.    आदिल रशीद        655
8.     कगिसो रबाडा      628
9.     अक्षर पटेल           624
10.   मशरफे मोर्तजा     623