मुंबई : १९व्या सीएट क्रिकेट अॅवॉर्ड्सचं नुकतच वितरण करण्यात आलं. भारताच्या फलंदाज अजिंक्य रहाणेची सीएट सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले, तर श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात २६४ धावांची विक्रमी खेळी करणारा भारताचा सलामीवीर रोहित शर्माला या विक्रमाबद्दल विशेष अॅवॉर्ड देण्यात आला. भारताचे माजी कसोटीपटू आणि कर्णधार कपिलदेव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रहाणेने यावेळी सांगितले की, 'लॉर्डसवर भारताच्या विजयात मोलाचे ठरलेले शतक हे आपल्या कारकीर्दीतले विशेष असे शतक आहे.'
सीएट अॅवॉर्ड विजेते
सर्वोत्तम क्रिकेटपटू : कुमार संगकारा
विशेष पुरस्कार : रोहित शर्मा
सर्वोत्तम फलंदाज : हशिम अमला
सर्वोत्तम गोलंदाज : रंगना हेराथ
सर्वोत्तम ट्वेन्टी-२० क्रिकेटपटू : ड्वेन ब्राव्हो
लोकप्रिय क्रिकेटपटू : किरॉन पोलार्ड
सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू : अजिंक्य रहाणे
सर्वोत्तम स्थानिक क्रिकेटपटू : विनय कुमार
सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू : दीपक हुडा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.