मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डिविलियर्स आणि विराट कोहलीनं नवा विक्रम आपल्या नावे केलाय. या सामन्यात दोघांनी केलेल्या २१५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बंगळुरूनं मुंबईवर ३९ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात एबी डिविलीयर्सनं ५९ चेंडूत १३३ धावा केल्या, ज्यात १९ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. तसंच विराट कोहलीनं ५० चेंडूत ८२ धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. दोघांना १०२ चेंडूत २१५ धावांची भागिदारी केली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च भागिदारी आहे.
त्यांच्या या भागिदारीच्या जोरावर बंगळुरूनं २३५ धावांच आव्हान मुंबईसमोर ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करतांना मुंबईला १९६ धावाच करता आल्या. त्यामुळं आता अंकतालिकेत मुंबई १२ अंकासह सहाव्या स्थानी आहे. तर बंगळुरूनं १३ अंकासह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.