बिग बॉसचं `तिकीट टू फिनाले`…

‘बीग बॉस सीजन ७’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलीय. ही लक्षणं आहेत... या शोचा ग्रँन्ड फिनाले जवळ आल्याची...

Updated: Dec 11, 2013, 06:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बिग बॉस सीजन ७’ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपलीय. ही लक्षणं आहेत... या शोचा ग्रँन्ड फिनाले जवळ आल्याची...
आत्तापर्यंत पर्यंत प्रत्येक जण बिग बॉसच्या घरात एकमेकांवर केवळ आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होता. पण, आता मात्र उरलेल्या आठ स्पर्धकांच्या दोन टीम करण्यात आल्यात. त्यामुळे आता या घरातील स्पर्धकांमध्ये केवळ वाद न होता भांडणंही सुरू झाली. बिग बॉस सीजन ७ ची `ग्रँड फिनाले` दोन आठवड्यावर शिल्लक असताना स्पर्धकांची उत्सुकतादेखील वाढली आहे. आता बिग बॉसच्या घरात केवळ आठ जण एकमेकांना प्रतिआव्हान करताना दिसत आहेत. आता कुठे प्रत्येक स्पर्धकानं आपले खरे रंग दाखवाला सुरुवात केलीय असं म्हणता येईल.
‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्ये दोन ‘टीम ए’ आणि ‘टीम बी’ अशा या दोन टीम करण्यात आल्या आहेत. ‘टिम ए’मध्ये अरमान, तनिषा, अॅण्डी आणि संग्रामचा समावेश आहे. तर ‘टीम बी’मध्ये कुशाल, गौहर, कामया आणि एजाझ हे सहभागी आहेत. या आठवड्यात लक्झरी बजेट टास्कबरोबरच, `टिकेट टू फिनाले` टास्कद्वारे विजेत्याला शोच्या `ग्रॅण्ड फिनाले` मध्ये `डायरेक्ट एन्ट्री` करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धात आता दोन टास्क करण्यात येणार आहे पहिला `समय से पहरा` आणि दुसरा `शैतान और फरिश्ता` हे दोन्ही टास्क स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात करायचे आहे. `समय से पहरा` या पहिल्या टास्कमध्ये स्पर्धकांना प्रत्येक मिनिट उच्चारून घड्याळाच्या वेळेवर लक्ष ठेवून प्रत्येक तासाच्या शेवटी योग्य वेळ घोषित करण्याची कामगिरी देण्यात आली आहे आणि `शैतान और फरिश्ता` या दुरऱ्या टास्कमध्ये आपल्या मेडलचे रक्षण करुन विरूद्ध टीमचे मेडल चोरण्याची कामगिरी स्पर्धकांवर सोपविण्यात आली आहे.
टास्कच्या शेवटी हरलेल्या टीममधील चांगली कामगिरी न केलेल्या स्पर्धकाला स्पर्धेतून बाहेर काढण्याचा अधिकार जिंकलेल्या टीमला देण्यात आला आहे. त्याचप्रमाने ‘कभी हा कभी ना’ या शेवटच्या टास्कमध्ये एका टीमने विरूद्ध टीमला काही आज्ञा करायची आहे आणि ही आज्ञा दुसऱ्या टीमने पूर्ण करायची आहे कारण की आज्ञेच्या पूर्ततेवर दोन्ही टीमला गुण देण्यात येणार आहेत.
पहिले दोन टास्क करण्यास असमर्थ ठरलेली ‘बी टिम’ ही शेवटचा टास्क जिंकेल का? आणि विरुद्ध टीममधील एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवेल का? तसेच ग्रँड फिनालेचे डायरेक्ट तिकीट कोणाला मिळेल? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.