सचिन तेंडुलकरचा वन-डे क्रिकेटला अलविदा

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 23, 2012, 02:57 PM IST

www.24taas.com,मुंबई
जगातील भल्या भल्या बॉलरला इंगा दाखवणारा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला सध्या अपयशाचा सामना करावा लागत होता. आज सचिनने वन-डे क्रिकेटला अलविदा केला आहे.
सातत्याने येणारे अपयश यामुळे मास्टरवर टीका होत होती. त्याला निवृत्तीचा सल्ला देण्यात येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील ७६ धावांची एक मात्र खेळी वगळता सचिनची बॅट म्यान झाली. सचिनच्या निवृत्तीची चर्चा ‘जोरात’ असून पत्नी नागपुरात दाखल झाल्यामुळे या चर्चेला उधाण आलं होतं.
सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. सचिन आतापर्यंत ४३४ वनडे सामने खेळला आहे. मात्र सचिन टेस्ट क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
दरम्यान, २५ डिसेंबरपासून सुरु होणा-या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर खेळणार नाही. सचिनने आपल्या निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया जाहीर करताना म्हटलंय की, मी वन डे क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. विश्वचषक क्रिकेटचा मी सदस्य होतो ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. येत्या २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेची तयारीही आत्तापासून सुरु करायला हवी. त्यादृष्टीने मी निवृत्ती घेत आहे.
सचिनची वन डे कारकिर्दीत एकूण सामने ४६३ सामने खेळला. यामध्ये त्यांने ३९ शतके झळकावलीत तर ९६ अर्ध शतके केली आहेत. सचिनने सर्वोत्तम कामगिरी करताना नाबाद २०० रन्स फटकाविल्या आहेत.

सचिनचा विक्रम
सचिनने १९८९ मध्ये गुजरानवाला येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तर यावर्षी आशिया करंडक स्पर्धेत ढाका येथे पाकिस्तानविरोधातच त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. सचिनने आतापर्यंत ४६३ एकदिवसीय सामने खेळत, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.
१८ हजार रन्स
सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८ हजार ४२६ रन्स केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावांची खेळी करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेर येथे झालेल्या सामन्यात नाबाद २०० रन्सची खेळी करत पाकिस्तानच्या सईद अन्वरचा १९४ सर्वाधिक रन्सचा विक्रम मोडला होता.