www.24taas.com, मुंबई
साहित्य -
१ वाटी पातळ तूप, १ वाटी पाणी, सव्वा वाटी साखर, ५ वाट्या मैदा, चिमुटभर मीठ, तळण्याकरता तेल.
कृती -
एका पसरट भांड्यात एक वाटी पातळ तूप, एक वाटी पाणी, सव्वा वाटी साखर घालून गॅसवर ठेवून ढवळावे. उकळी आली की लगेच बंद करावे. वरील मिश्रण परातीत घेऊन अंदाज घेत घेत मैदा घालून, साधारण गरम-गरम मळावे. पोळीसाठी करतात तसे गोळे करून साधारण जाडसर लाटून कातण्याने कापून घ्यावेत.
कापलेल्या शंकरपाळ्या मंद आंचेवर गुलाबी रंगा येईपर्यत तळाव्यात.