www.24taas.com, सोलापूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूरात असतील. सोलापूरमध्ये आज त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. कोल्हापूर, खेडनंतर राज ठाकरे सोलापुरात काय बोलणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय.
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे लोक हैराण झालेत. पाण्याविना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सोलापुरकरांचं लक्ष लागलंय.
‘नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असल्याचे ते सांगतात, पण आधी त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेली नाशिकची महापालिका सुधारून दाखवावी’ असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरेंच्या सभांना गर्दीही चांगलीच जमली होती. मात्र गर्दीचं रुपांतर कधी मतांमध्ये होत नसतं असंही दादांनी म्हटलं होतं... आज सोलापुरात राज ठाकरे पुन्हा एकदा दादांना प्रत्युत्तर देणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.