www.24taas.com, शिर्डी
औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करण्यात यावी अशी मागणी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शहरावरील पाणीसंकट टाळण्यात औरंगाबाद महापालिका कुचकामी ठरली आहे.
त्यामुळे महापालिका तातडीनं बरखास्त करा, तसंच मराठवाड्यातील नेत्यांनी पाणीप्रश्नावरून वाद निर्माण करण्यापेक्षा, जायकवाडीतील पाण्याच्या मृतसाठ्याचा प्रभावीपणे वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही विखे पाटील यांनी दिला आहे.
जायकवाडीतून औरंगाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून ४० टक्के पाण्याची गळती होत असतांना, महापालिका काय करतेय? असा सवाल विखे पाटील यांनी केला आहे.