श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर उदयनराजे भोसले संतापले

खासदार उदयनराजे भोसले यांनी श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर जोरदार टीका केलीय. 25 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च न झाल्यास योजनाच तहकूब करण्याची शिफारस दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 3, 2012, 06:39 PM IST

www.24taas.com, पुणे
खासदार उदयनराजे भोसले यांनी श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर जोरदार टीका केलीय. 25 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च न झाल्यास योजनाच तहकूब करण्याची शिफारस दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
परिणामी सरकारने योजनांना निधी उपलब्ध करून दिला नाही तर जनतेतून प्रतिसरकारची निर्मिती होईल असा इशाराही त्यांनी दिलाय. सत्ताधारी पक्षाचे खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांनी श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर तोफ डागल्यानं आगामी काळात हा मुद्दा पेटणार असल्याचं स्पष्ट झालंय.
दरम्यान, राज्य सरकारने सादर केलेल्या सिंचनाची श्वतपत्रिका मराठवाड्याच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. कारण या श्वतपत्रिकेतल्या तरतुदीनुसार 25 टक्क्यापेक्षा कमी काम झालेल्या प्रकल्पांचं कम रद्द करण्याची शिफारस करण्यात आलीये. ही तरतूद मान्य झाल्यास मराठवाड्यातील 54 प्रकल्प धोक्यात येणार आहेत.