www.24taas.com, पुणे
सुरेश पठारेनी राजीनामा दिलेला नाही. तर, त्यांना काढण्यात आल्याची शक्यता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलीय.
अण्णांच्या आंदोलनाला अनेकांकडून मोठा निधी मिळाला आहे. या निधीच्या वाटपावरून वाद निर्माण झालेला वाद आणि केजरीवालांशी पठारेंची वाढती जवळीक. यातूनच सुरेश पाठरेंचा राजीनामा घेण्यात आल्याची शक्यता सप्तर्षींनी व्यक्त केली.
अण्णा हजारेंचे सहकारी आणि स्वीय सहायक सुरेश पठारे यांनीही काल अण्णा हजारेंची साथ सोडलीय.
पठारे यांनी आपला भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचा त्यांचा राजीनामा अण्णांकडे सोपवला असून अण्णांनी पठारेंचा राजीनामा मंजूर केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण हा राजीनामा देत असल्याचं कारण सुरेश पठारे यांनी दिलंय. मात्र, मागील काही दिवसांपासून अण्णांचे सहकारी त्यांच्यापासून दूर जात असल्याचं चित्र आहे.