...तर महिला मंत्रालयावर करंजा तळतील - सुप्रिया सुळे

“अनुदानित सिलेंडरची संख्या दिवाळीपुर्वी वाढवली नाही, तर महिला मंत्रालयावर करंजा तळायला जातील मुख्यामंत्र्यांनी असं होऊ नये याची काळजी घ्यावी” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 6, 2012, 10:54 PM IST

www.24taas.com, पुणे
“अनुदानित सिलेंडरची संख्या दिवाळीपुर्वी वाढवली नाही, तर महिला मंत्रालयावर करंजा तळायला जातील मुख्यामंत्र्यांनी असं होऊ नये याची काळजी घ्यावी” असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
सासवडमध्ये यशस्विनी सामाजिक अभियाना अंतर्गत महाराष्ट्राची खरेदी जत्रा आयोजीत करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रीया सुळेंनी 4 सिलेंडरच्या निर्णयावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं.
राज्यात अनुदानीत गॅस सिलेंडरची संख्या 6 वरुन 9 करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याचा निर्णय होत नाहीये. या पार्श्वभूमीवर हा टोला लगावला आहे.