www.24taas.com, कोल्हापूर
नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून कोल्हापुरच्या महालक्ष्मीसाठी शालू अर्पण करण्यात येतो. यंदाही श्री महालक्ष्मीच्या चरणी तिरुपतीचा शालू अर्पण करण्यात आला.
श्री महालक्ष्मी ही तिरुपतीची पत्नी समजली जाते. त्यामुळेच प्रत्येक नवरात्रात तिरुपतीहून देवीसाठी शालू अर्पण करण्याची प्रथा आहे. तिरुपती देवस्थानचे पुजारी हा शालू घेऊन आज कोल्हापुरात दाखल झाले.
यावेळी भवानी मंडपातून या शालूची पुजा करून वाजत गाजत हा शालु देवीच्या चरणी अर्पण केला. दस-याच्या दिवशी हा शालू देवीला परिधान करण्याची प्रथा आहे.