www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बॉम्बस्फोट प्रकरणी येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्त याला पुन्हा पॅरोल मंजूर झाला आहे. त्यामुळे तो दुसऱ्यांदा जेलबाहेर येणार आहे.
संजय दत्तला यावेळी त्याला तब्बल महिनाभर म्हणजेच ३० दिवस सुट्टी मिळणार आहे. पत्नी मान्यताची प्रकृती ठीक नसल्याने पॅरोल मंजूर झाला आहे. उद्या सकाळी संजूबाबा पुन्हा जेलबाहेर येईल.
यापूर्वी एक ऑक्टोबरला संजूला १४ दिवासांची सुट्टी मिळाली होती. ही सुट्टी नंतर वैद्यकीय कारणांसाठी आणखी १४ दिवस वाढवली होती. त्यामुळे संजूबाबा एकूण २८ दिवस जेलबाहेर होता.
मुंबई बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी संजय दत्तनं दीड वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळं आणखी साडेतीन वर्षाची शिक्षा संजयला भोगायची आहे.
संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षा भोगण्यासाठी २२ मे रोजी येरवडा कारागृहात ठेवण्यात आले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.