पिंपरी-चिंचवडमध्ये चाललंय काय?

सध्या पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. एका गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्यानं शहरात पुन्हा एकदा महिला सुरक्षांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 1, 2013, 10:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
सध्या पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. एका गतीमंद मुलीवर बलात्कार झाल्यानं शहरात पुन्हा एकदा महिला सुरक्षांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वेगानं विकसीत होणा-या या शहराची काळी बाजू पुन्हा एकदा समोर आलीय.
पिंपरी चिंचवड मध्ये एका गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्यान शहरात एकच खळबळ उडालीय.शहरात नेमक चाललय तरी काय असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वेगानं विकसित होणारं शहर म्हणून पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला जातो. पण याच पिंपरी चिंचवड शहराची काळी बाजू आता समोर येवू लागलीय.
-पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं चाललंय तरी काय ?
-जानेवारी ते जुलै-बलात्काराच्या 32 घटना
-जानेवारी ते जुलै-विनयभंगाच्या 42 घटना
-दर आठवड्याला एक बलात्कार
अशी शहराची स्थीती आहे. त्यामुळं साहजिकच पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर या आकडेवारीमूळं शिकामोर्तब झाल्याचं उघड होऊ लागलय.
शहरात महिलावरिल अत्याचाराच्या घटनामध्ये दिवंसेदिवस वाढ होतय. खुद्द पोलिसांनी या अशा घटना वाढल्याचं मान्य केलंय.शासनाने सुरु केलेल्या योजनांना प्रतिसाद मिळत नसल्याचही त्यांनी सांगितलंय.
पिंपरी चिंचवड मधली ही आकडेवारी राज्यातल्या कायदा आणि सूव्यवस्थेची काय अवस्था आहे हे सांगायला पुरेशी आहे. फक्त पिंपरी चिंचवड च नाही तर विकास होत असलेल्या शहरांची स्तिथी कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी यंत्रणा कमी पडतेय यात शंकाच नाही. रस्त्यावरून जाताना जर महिला सुरक्षित नसतील तर हे पोलीसांच मोठ अपयश आहे. त्याच मूळ पोलिसांनी पर्यायान गृह खात्यांनं उरलेली लाज राखण्यासाठी तरी प्रयत्न करणे गरजेच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.