www.24taas.com, झी मीडिया, पुणे
तब्बल साडे पाच फूट लांब आणि वजनाने आठ किलो असलेल्या एका अजगराला चाकणच्या वसुंधरा बहु उद्देशीय संस्थेच्या सर्प मित्रांनी पकडून गावातल्यांना भयमुक्त केलं आहे.
पुण्याजवळ मावळ परिसरात निगडे गावात या अजगराने अनेकांच्या डोळ्यादेखत एका कुत्र्याच्या पिल्लाला फस्त केलं आणि पूर्ण गाव भयभीत झालं होत. हा अजर आपल्यावर हल्ला करील, अशी भीती गावकऱ्यांमध्ये होती.
या अजगराची माहिती चाकणच्या वसुंधरा बहु उद्देशीय संस्थेतील सर्प मित्रांना मिळाली. त्यांनी या गावात जाऊन हा अजगर पकडला. आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. चाकण वन विभाग कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सर्प मित्रांनी या अजगराला जंगलात सोडले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.