नान्नजमध्ये उरलेत केवळ आठ ‘माळढोक’!

सोलापूर जिल्ह्यातल्या माळढोक पक्षी अभयारण्यावरून सध्या वाद निर्माण झालाय. एकीकडे दूर्मिळ अशा माळढोक पक्षाची संख्या कमी होऊ लागलीये तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या अभयारण्यातली जागा अधिसूचित करण्याचा निर्णय दिलाय. शेतकऱ्यांचा मात्र जमिनी देण्याला विरोध आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 8, 2013, 10:22 AM IST

www.24taas.com, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातल्या माळढोक पक्षी अभयारण्यावरून सध्या वाद निर्माण झालाय. एकीकडे दूर्मिळ अशा माळढोक पक्षाची संख्या कमी होऊ लागलीये तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या अभयारण्यातली जागा अधिसूचित करण्याचा निर्णय दिलाय. शेतकऱ्यांचा मात्र जमिनी देण्याला विरोध आहे.
सुंदर आणि तितकाच रुबाबदार असा माळढोक पक्षी आढळतो तो उत्तर सोलापूरमधील ‘नान्नज’ अभयारण्यात... मूळचा राजस्थानचा राजपक्षी म्हणून ओळख असलेल्या या माळढोक पक्षानं आता अनेक वर्षांपासून इथे विसावा घेतल्यानं पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरलीय. परिसराला आता माळढोक अभयारण्य म्हणून देभभर प्रसिद्धी मिळालीय. या दूर्मिळ पक्षासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या १७६ गावातील ७२ हजार ४६१ हेक्टर जमीन अधिसूचित करण्याचा निर्णय सर्वेच्च न्यायालयानं दिलाय. मात्र, परिसरातल्या शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शवलाय.
नान्नज अभयारण्यात माळढोक पक्षांची संख्या आता केवळ आठवर आलीय. ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं पक्षीमित्रांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी अधिसूचित करून वनविभाग बिल्डर लॉबीची साथ देत नाही ना? अशी शंका पक्षीमित्रांनी उपस्थित केलीय. तर शेतकऱ्यांना इथल्या पारंपरिक शेतीला वनविभागाचा आक्षेप नसल्याचं म्हटलंय. मात्र, सर्व हरकतीनंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असंही वनविभागाचे अधिकारी सांगताहेत.

डौलदार आणि देखण्या माळढोक पक्षाचं दर्शन मात्र दिवसेंदिवस दुर्लभ होत चाललंय. त्याचं जतन करायचं असेल, तर परदेशाप्रमाणे बंदिस्त प्रजोत्पानाचा प्रयोग राबविणं गरजेचं आहे. तरच पक्षीप्रेमींसह पर्यटकांचीही पावलं इकडे आपसूक वळतील.