www.24taas.com, पंढरपूर
पंढरपूरचा विठुराया प्रचंड श्रीमंत... भक्तांच्या प्रेमाची श्रीमंतीही त्याला भरभरुन मिळाली आहे आणि पैशानंही अतिशय श्रीमंत देवस्थान. आजच्या घडीला विठ्ठलाच्या खजिन्यात 70 ते 80 कोटी सहज आहेत. आणि 15 ते 20 किलो सोन्याच्या दागिन्यांचा खजिनाही तो सांभाळत आहे.
या सगळ्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे, विठोबाच्या सोलापुरात दुष्काळानं कहर केलाय. शेतकरी देशोधडीला लागलेत. जनावरं चाऱ्याविना मरत आहेत. पण त्याचं कुठलंही सोयरसुतक या मंदिर समितीला नाही. राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देवस्थानांनी पुढाकार घेतला आहे. पण सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळ मात्र विठ्ठलाच्या मंदिर समितीला दिसत नाही. मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे तर पंढरपुरात दुष्काळच नाही, असं सांगत आहेत.
विठोबा शेतक-यांचं दैवत... त्याच्यासाठी शेतकरी मैलोनमैल वारी करतात. त्यांच्याच जीवावर देवस्थानं श्रीमंत झाली. पण ज्यावेळी भक्तांसाठी काही करण्याची वेळ आली, त्यावेळी विठोबाचे हे तथाकथित राखणकर्ते सोयीस्करपणे गप्प बसले आहेत.