www.24taas.com, पुणे
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांच पद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाल्याने आयुक्त श्रीकर परदेशी यांनी फुगे यांचे पद रद्द केलं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा धक्का मानला जात आहे.
नगरसेविका सीमा फुगे यांनी जात प्रमाणपत्र बनावट सादर करून निवडणूक अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं आयुक्तांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं फुगे यांनी म्हटलं आहे.
बनावट प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सीमा फुगे यांच्या विरुध्द भोसरी पोलीस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात गुन्हा दाखल करण्यात होता. त्यानंतर सीमा या फरारी होत्या.
जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सरकारची आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची फसवणूक केल्याचे सकृतदर्शनी सिद्ध झाल्यानंतर, अखेर सात महिन्यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कारवाईचा बडगा उचलला. शिवाय गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या सीमा या पत्नी आहेत.