सीसीटीव्हीत लाइव्ह मर्डर

धक्क्दायक बातमी पुण्याहून.... दारूच्या आहारी गेल्यानंतर काय होतं, याचं अतिशय धक्कादायक उदाहरण चाकणमध्ये समोर आलंय. दारूच्या नशेत अतिशय शांत डोक्यानं एका मित्रानंच मित्राचा खून केला. ही हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 24, 2013, 09:04 PM IST

www.24taas.com, कैलास पुरी, झी मीडिया, पुणे
धक्क्दायक बातमी पुण्याहून.... दारूच्या आहारी गेल्यानंतर काय होतं, याचं अतिशय धक्कादायक उदाहरण चाकणमध्ये समोर आलंय. दारूच्या नशेत अतिशय शांत डोक्यानं एका मित्रानंच मित्राचा खून केला. ही हत्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
थरकाप उडवणारी ही दृश्यं....... आकाश भालेराव या २३ वर्षांच्या युवकानं त्याचाच मित्र नितीन विरणक याची हत्या केलीय. रविवारी रात्री अकराच्या सुमाराला ही घटना घडली.
ज्यानं खून नितीन आणि आकाश हे दोघे चाकणमधल्या खराबवाडीतल्या हॉटेल अथर्वमध्ये दारू पिण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर त्यांचे इतर दोन मित्रही होते. पण त्यांच्यात प्रचंड वादावादी झाली. त्यात दारूच्या नशेत असलेल्या आकाशनं नितीनला थेट गोळी घातली. त्यात नितीन जागीच ठार झाला. पोलिसांनी आकाश भालेरावला सोमवारी पहाटे अटक केलीय.
आकाशनं बंदुकही बेकायदेशीरपणे बाळगल्याचं समोर आलंय. त्याला ही बंदुक कुठून मिळाली, याचा पोलीस शोध घेतायत. त्याचबरोबर त्यांच्या इतर मित्रांचाही शोध सुरू आहे.

दारू पिताना मित्रांमध्ये ब-याचवेळा वाद होतात. पण या वादातून थेट खून झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.