www.24taas.com, प्रताप नाईक, झी मीडिया कोल्हापूर
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अवैध्य धंदे सुरु असल्याचं खुद्द अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनीच दाखवून दिलंय. वर्षभरापासून त्यांनी ठिकठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा टाकून अवैध्य व्यवसायिकांवर कारवाई केलीय.
एकीकडे ज्योतीप्रिया सिंग ह्या संबधीत पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन अवैध्य व्यवसायिकांवर कारवाई करतात मग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काय करतात? असा प्रश्न उपस्थित झालाय.
कोल्हापूर पोलीस दलातील लेडी सिंघम म्हणुन अप्पर पोलीस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंग यांची ओळख. अनेक ठिकाणच्या मटक्या अंड्यावर छापे टाकून कारवाई केली. तशीच कारवाई त्यांनी सोमवारी रात्री जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली.
सहा ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 28 हजार रुपये 10 मोबाईल जप्त करत 10 आऱोपींना अटक केली. त्याचबरोबर पोलीस खाक्या दाखवत अनेक मटका व्यावसयीकांची माहिती घेतली.
एकीकडं अप्पर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग ह्या अवैद्य व्यवसायाविरोधात कारवाई करताना दिसतायत. पण दुसरीकडं मात्र ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंदे सुरु आहेत तिथले, पोलीस निरीक्षक मात्र संबधीत व्यवसायीकांकडं जानुन बुजुन दुर्लक्ष करताना दिसतायत.
या पाठीमागचे गौंडबंगाल काय असा प्रश्न कोल्हापूरकर विचारतायत. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंदे सुरु असतील, त्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करणार, असं पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी जाहीर सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही.
ज्योतीप्रिया सिंग सारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी वारंवार कारवाई करताना दिसतायत, पण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी मात्र अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशालाच वाटण्याचा अक्षाता लावतायत. अशा पोलीस अधिकारी आणि कर्माचा-यांवर कारवाई कोण आणि कधी करणार हा खरा मुद्दा आहे.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.