सांगली जिल्ह्यातील गोंधळेवाडीत सापडलेल्या दोन हाथ बॉम्बप्रकरणी गुलाब सांगोलकर यांना अटक करण्यात आली आहे. लष्करातून निवृत्त झालेल्या सांगोलकरांनी 1999 मध्ये हे हातबॉम्ब आणले होते.
मात्र लष्करातून अशाप्रकारे दारूगोळा आणता येत नाही. तरीही त्यांनी हाथ बॉम्ब कसे आणले याचा आता तपास सुरू आहे.
दरम्यान बॉम्ब सापडल्यानंतर गावात घबराटीचं वातावरण पसरलं होतं.
एका झाडाखाली सातवीतील विध्यार्थ्याला हे बॉम्ब सापडले होते. त्याने ही माहिती शिक्षकांना दिल्यानंतर तत्काळ पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं होतं.