जत तालुक्याची शासनाकडून फसवणूक

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याची शासनाकडून फसवणूक करण्यात आलीय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केवळ कालव्यातून म्हैशाळ योजनेचं पाणी सोडण्याचा आणि पाणी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटा-माटात घेण्यात आला. मात्र पंधरा दिवसातच जतला सोडण्यात आलेलं हे पाणी बंद करण्यात आलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2012, 10:50 AM IST

www.24taas.com, सांगली
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याची शासनाकडून फसवणूक करण्यात आलीय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केवळ कालव्यातून म्हैशाळ योजनेचं पाणी सोडण्याचा आणि पाणी पूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटा-माटात घेण्यात आला. मात्र पंधरा दिवसातच जतला सोडण्यात आलेलं हे पाणी बंद करण्यात आलंय.
शिवाय राज्यकर्त्यांच्या निष्काळजी पणामुळे हे पाणी कर्नाटकच्या दिशेनं वाहून चाललंय. जतचा पाणी पुरवठा लवकर सुरु केला नाही, तर रस्त्यावर उतरून आक्रमक लढा उभा करण्याचा इशारा आक्रमक झालेल्या दुष्काळग्रास्तानी दिलाय. म्हैशाळ उपसा जलसिंचन योजनचे पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्या ऐवजी, हे पाणी मधेच तासगावला पळवल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी झी २४ तास वरून प्रसारित करण्यात आलं होतं.
त्यानंतर राज्य सरकारनं आणि म्हैशाळ उपसा जलसिंचन विभागानं याची तत्काळ दखल घेतली. आणि म्हैशाळ योजनेचं पाणी जतच्या शिवारात सोडण्यात आलं. मात्र पंधरा दिवसातच जतला सोडण्यात आलेले पाणी बंद करून सरकारनं एकप्रकारे दुष्काळग्रस्तांच्या तोंडी पानं पुसण्याचच काम केलय.