www.24taas.com, झी मीडिया, सांगली
अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.
मराठवाडा आणि विदर्भ आणि काही पश्चिम महाराष्ट्रात गारपीटीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या तासगाव तालुक्यामधील नैराश्यामुळे चिंतीत असलेले शंकर आणि लक्ष्मी पाटील या दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केली. याआधी धुळ्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.
हे दाम्पत्य तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील शेतकरी कुटुंबातील आहे. गारपीटीने शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचे त्यांचे भाऊ प्रभाकर पाटील यांनी सांगितले. तर आत्महत्या ही कौटुंबिक कारणामुळे झाल्याचा दावा तासगाव पोलिसांनी केला आहे.
पाटील दाम्पत्यांनी आत्महत्या करण्या आगोदर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दाखवली. या प्रकरणी मृत शंकर पाटील यांचा मुलगा नंदकुमार आणि सून तनुजा यांच्या विरोधात आत्म्हतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.आता शेतातून आपल्या हाती काहीच येणार नसल्याने हताश झालेल्या पाटील यांनी पहाटे शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली.
या दोघा शेतक-यांचं गारपिटीमुळं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळं निराशेपोटी त्यांनी मृत्युला कवटाळल्याचं बोलंलं जातंय. मात्र यामुळं मदत देण्यास होत असलेली सरकारची दिंरगाई आता शेतक-यांच्या जीवावर उठू लागल्याचं यानिमित्तानं दिसून आलंय.
धुळे जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपासून होत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाचा अस्मानी हा फटका९ फेब्रुवारीपर्यंत कायम राहिला आणि त्याने होत्याचे नव्हते करून टाकले. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला. पाटील यांच्यावर कर्जाचा बोजा होता. तसेच वीजबिलही थकीत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.