पुणे: रेल्वे ट्रॅक्स ठरती जीवघेणे !

रेल्वे अपघातांचं प्रमाण फक्त मुंबईतच जास्त आहे असं नाही तर, आता पुण्यातही रेल्वे ट्रॅक जीवघेणे झाले आहेत. पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर या मार्गांवर दर दोन दिवसांमागे तीन प्रवासी रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडतायत..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 26, 2013, 07:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
रेल्वे अपघातांचं प्रमाण फक्त मुंबईतच जास्त आहे असं नाही तर, आता पुण्यातही रेल्वे ट्रॅक जीवघेणे झाले आहेत. पुणे-सातारा आणि पुणे-सोलापूर या मार्गांवर दर दोन दिवसांमागे तीन प्रवासी रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडतायत..
रेल्वे रूळ पायी ओलांडणं हे बेकायदेशीर आहे. पण अनेक ठिकाणी प्रवाशांना त्याची फिकिरच दिसत नाही. रेल्वे रूळ ओलांडताना कित्येक प्रवासी नाहक आपल्या प्राणाला मुकतात. रेल्वेच्या पुणे विभागाची आकडेवारी तर हेच सांगते. गेल्या तीन वर्षात रेल्वे अपघातात सुमारे सतराशे लोकांचा मृत्यू झालाय. गेल्या फक्त एका वर्षात 510 लोक रेल्वे ट्रॅकवर बळी पडले आहेत.
रेल्वे रुळ ओलांडणा-यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते...मात्र अशा कारवाई नंतरही अपघातांमध्ये वाढच झाल्याचं दिसून येतंय...
वर्ष मृतांची संख्या
२०१० ४३७
२०११ ४३५
२०१२ ५१०
२०१३ (एप्रिलपर्यंत) २७५
पुण्यासह लोणावळा , घोरपडी , मांजरी आणि लोणी स्टेशनच्या हद्दीत हे अपघात घडले आहेत. या स्टेशनच्या परिसरात रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. पायी चालण्याचे अंतर वाचविण्यासाठी त्यातील बहुतेक जण रेल्वे रुळ ओलांडून जातात. याच भागात अपघाताचे प्रमाणात अधिक असून , त्यातील बहुतेक जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तसेच, अनेक जण जायबंदी झाले आहेत. म्हणजेच थोडसं अंतर आणि वेळ वाचवण्याचा प्रवासाचा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतताना दिसतोय. त्यासाठी फक्त कारवाई गरजेची नाही तर, प्रवाशांनी देखील जागरूक होणे गरजेचे आहे…

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.