पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचा थेट आयुक्तांशी संवाद!

पिंपरी चिंचवड मधल्या नागरिकांसाठी एक गुड न्यूज आहे. आता पिंपरी चिंचवड मधले नागरिक थेट आयुक्तांशी संवाद साधू शकणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 4, 2013, 09:00 PM IST

www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड मधल्या नागरिकांसाठी एक गुड न्यूज आहे. आता पिंपरी चिंचवड मधले नागरिक थेट आयुक्तांशी संवाद साधू शकणार आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेच्या संगणक विभागान महापालिकेच्या संकेत स्थळामध्ये कमालीचे बदल केले आहेत. ज्या मूळ नागरिक थेट पालिकेच्या संकेत स्थळावर तक्रार दाखल करू शकणार आहेत. प्रत्येक तक्रार आयुक्त श्रीकर परदेसी जातीन पहाणार आहेत. ज्या विभागाशी तक्रार संबंधित आहे त्या विभागाने तक्रार सोडवण्यास उशीर केला तर त्याच्यावर आयुक्त कारवाई करणार आहेत. इतरही अनेक बदल या संकेत स्थळावर करण्यात आले आहेत. ज्या मूळ पालिकेचा कारभार आणखी पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा चेहरा मोहराच बदलण्याचा विडा घेतलेल्या आयुक्त श्रीकर परदेसी यांनी पारदर्शक कारभारासाठी आणखी एक पाउल पुढ टाकलय. आयुक्तांनी संगणक विभागाला आदेश देत जुन्या संकेतस्थळामध्ये प्रचंड बदल केले असून त्याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे. www.pcmcindia.gov.in या पालिकेच्या संकेतस्थळावरून कोणताही नागरिक कसल्याही प्रकारची तक्रार थेट करू शकतो. नागरिकांशी संवाद या सदरा मध्ये जावून कोणत्याही व्यक्तीन एकदा नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सह एकदा नोंदणी केली की तो त्याची तक्रार इथे दाखल करू शकतो. त्यावर काय कारवाई झाली हे नागरिक तपासू शकतो. नागरिकाना तक्रारी बरोबरच काही सुचना किंवा काही कल्पना द्यायच्या असतील तरी ते थेट या ठिकाणी देवू शाकणार आहेत. चांगल्या कल्पनांना आणि सूचनांना या संकेत स्थळावर प्रसिद्धही केल्या जाणार आहेत.

एवढच नाही तर दर आठवड्याला दाखल होणाऱ्या तक्रारींचा अभ्यास आयुक्त स्वत: करणार आहेत. कारवाईला उशीर होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरलं जाणार आहे. या ही पुढे जात प्रत्येक नगरसेवकाचा नंबर आणि इ मेल या वेब साईटवर देण्यात आला आहे. नागरिक थेट त्यांच्या इ मेल वर तक्रार दाखल करू शकणार आहेत आणि त्याची नोंद या संकेत स्थळावर असणार आहे. माहिती अधिकार अर्ज अपील अर्ज थेट संकेत स्थळावरून घेण्याची सुविधा करण्यात आली आहे. पालिकेच्या निविदा, बांधकाम परवानगी, कोणत्या बांधकामांना परवानगी मिळू शकते किंवा त्यासाठी काय कागदपत्र लागतात, अशा असंख्य सुविधांनी हे संकेतस्थळ सुरु करण्यात आलेलं आहे. पारदर्शक कारभारासाठी उचललेल हे आणखी एक महत्वाच पाऊल म्हणावं लागेल…