पेस-स्टेपनेक यूएस ओपनचे उपविजेते

अमेरिकन ओपनमध्ये लिएँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपनेकला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 8, 2012, 08:21 AM IST

www.24taas.com, न्यूयॉर्क
अमेरिकन ओपनमध्ये लिएँडर पेस आणि त्याचा चेक रिपब्लिकचा साथीदार राडेक स्टेपनेकला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं.
फायनलमध्ये स्टेपनेक जोडीला अमेरिकेच्या द्वितीय मानांकित बॉब आणि माईक ब्रायननं पराभूत केलं. पहिल्या सेटमध्ये पेस-स्टेपनेकला ६-३ नं पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ब्रायन ब्रदर्सनी पेस-स्टेपनेकला कमबॅकची कोणतही संधी दिली नाही. दुस-या सेटमध्ये ब्रायन ब्रदर्सनी ६-४ नं बाजी मारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यांना पराभवाला सामोर जाव लागलं. या पराभवासह पेसचं तिसऱ्यांदा अमेरिकन ओपन आणि टेनिस करिअरमधील चौदवं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंग पावलं.