मारियन बार्तोलीचं विम्बल्डन ट्रॉफीवर नाव

जर्मनीच्या सबिने लिसिकेवर मात करत फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं विम्बल्डनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. लिसिकीचा पराभूत करण्यासाठी बार्तोलीला केवळ 1 तास 20 मिनिटांचा कालावधी लागला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 6, 2013, 11:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
जर्मनीच्या सबिने लिसिकेवर मात करत फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं विम्बल्डनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. लिसिकीचा पराभूत करण्यासाठी बार्तोलीला केवळ 1 तास 20 मिनिटांचा कालावधी लागला. तिनं लिसिकीचा 6-1, 6-4 नं सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला. बार्तोली जिंकल्य़ामुळे विम्बल्डनला या सीझनमध्ये नवी टेनिस क्वीन मिळाली.
फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं जर्मनीच्या सबिने लिसिकीवर मात केली. आणि तिला आपल्या चेह-यावरचा आनंद लपवता आली. स्टेडियममध्ये उपस्थित तिच्या कुटुंबीयांना मिठी मारत तिनं ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचा आनंद साजरा केला. बार्तोलीच्या टेनिस करिअरमधील हे पहिलं-वहिलं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आणि तेही विम्बल्डनच्य़ा ग्रास कोर्टवर. बार्तोलीसाठी हा एक दुग्ध शर्करा योगच होता असचं म्हणाव लागेल. विम्बल्डनच्या या फायनलमध्ये बार्तोलीच विजयासाठी हॉट फेवरिट होती. मॅचच्या सुरुवातीपासूनच बार्तोलीनं मॅचवर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं होतं. तिच्या धडाक्यासमोर युवा लिसिकीचं काहीच चालल नाही. पहिल्या सेटमध्ये तर लिसिकीला केवळ एकच गेम जिंकता आला. दुस-या सेटमध्येही बार्तोलीचच वर्चस्व होतं. मात्र, सलग दोन गेम जिंकत लिसिकनं मॅचमध्ये थोडीफार रंगत निर्माण केली होती. मात्र, बार्तोलीनं सर्वस्व पणाला लावत जोरदार कमबॅक केलं. दुस-या सेटमध्ये तिनं 6-4 नं बाजी मारत दुस-या सेटबरोबरच विम्बल्डनचं अजिंक्यपदही पटकावलं.
2006 मध्ये फ्रान्सच्या ऍमिली मॉरिसमोनं ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन जिंकलं होतं. यानंतर फ्रान्सच्या टेनिसपटूला कुठल्याही ग्रँडस्लॅमवर आपलं नाव कोरता आलं नव्हतं. मात्र, बार्तोलिनं हा इतिहास बदलत ग्रँडस्लॅम जिंकलं. फ्रान्सच्या या गुणवान टेनिसपटूनं केलेली ही कामगिरी निश्चितच अभिमानास्पद अशीच म्हणावी लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.