www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जाणारा अॅस्टन व्हिला फुटबॉल क्लब विक्रीस काढला जाणार आहे. हा युनायटेड किंग्डमच्या बर्मिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जातो.
क्लबची सद्यस्थिती खूप खराब आहे. त्यामुळे हा क्लब विक्रीस काढत असल्याचे अॅ्स्टन व्हिलाचे मालक लेर्नर यांनी सांगितलंय. तसेच यापुढे या क्लबची जबाबदारी मालक या नात्याने सांभाळणे मला शक्य नाही. म्हणूनच क्लबचा मालकी हक्क नव्या मालकांवर सोपवणार असल्याचे लेर्नर म्हणाले.
लेर्नर यांनी २००६ मध्ये १०.५७ कोटी डॉलरला अॅस्टन क्लब विकता घेतला. मात्र क्लबची सध्याची कामगिरी पाहता २०१३-१४ मध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये क्लबला १५ वे स्थान मिळाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.