‘टूर दी डोपिंग’... आर्मस्ट्राँगचं जेतेपद रद्द

‘टूर डी फ्रान्स’ शर्यत विक्रमी सात वेळा जिंकणारा सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगवर आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनने अखेर बंदी घातलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 22, 2012, 08:26 PM IST

www.24taas.com, जिन्हिवा
‘टूर डी फ्रान्स’ शर्यत विक्रमी सात वेळा जिंकणारा सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगवर आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनने अखेर बंदी घातलीय. एव्हढचं नाही तर त्याचे सातही ‘टूर डी फ्रान्स’ जेतेपद परत घेण्यात आलेत. ‘टूर डी फ्रान्स’च्या विजेत्यांमधूनही आर्मस्ट्राँगचं नावही गाळण्यात आलंय.
अमेरिकेच्या अॅन्टी डोपिंग एजन्सीने केलेल्या चौकशीनंतर एका पत्रकार परिषदेत आर्मस्ट्राँगबाबत निर्णय जाहीर करण्यात आला. आर्मस्ट्राँगची चौकशी केल्यानंतर एक हजार पानांचा रिपोर्ट चौकशी आयोगासमोर ठेवण्यात आला होता. आर्मस्ट्राँगविरूद्ध एकूण २६ जणांचा जबाब नोंदवण्यात आला. यात १५ सायकलपटूंचाही सहभाग होता.